भाग१
दरवर्षी आम्हा चार भावंडांना घेऊन आईबाबा देवदर्शनाला जायचे. सवाांत मोठा मी, माझ्या पाठीवर जन्मलेली ताई,
राणी व विनू असे आम्ही चौघेभावंडं.
मला आठवतंय तसं, मी ४ थी व किंवा ५ वी ला असल्यापासून आईबाबा आम्हाला घेऊन जायचे. सुरवातीची काही वर्षे
भाड्याची टॅक्सी करून जायचो. सवशसाधारण सकाळी ०६.३० ते ०७.०० वाजेपयांत टॅक्सी गल्लीतल्या कोपर्यावर येऊन
थांबायची. मग धावपळ सुरू व्हायची, एकदा सर्वांचं चं आवरलं की, बांधुन घेतलेलं सामान गाडीत भरलं जायचे. या सामानात
गाडीत बसल्यानंतर खायला भडंग, रव्याचेलाडू, खोबर्याची बर्फी, कधी शंकरपाळ्या, देवपुजेला लागणारं साहित्य, दुपारचं जेवणाच्या दशम्या, सुकं पिठलं, दह्याचा डबा, लोणचे, पाण्याने,भरलेली कळशी, आणि माझ्या छोट्या बहीणी साठी व
भावासाठी जादा कपडे असं बरंच काही माझी आई बांधुन घ्यायची. हे सगळे डाग (फडक्यात बांधुन घेतलेली) मोजून गाडीत भरायचे व मग आमचा प्रवास सुरु व्हायचा.
२४.०५.२०२१ क्रमर्ः१